Recent Posts

Saturday, March 17, 2012

बघ माझी आठवण येते का.....

बघ माझी आठवण येते का.....
ओल्या चिंम्ब पावसात भिजताना
थेम्ब थेम्ब ते पावसाचे हातावर झेलताना
भिजले केस तुझे हलुवार पुसताना
बघ माझी आठवण येते का.....

कातरवेळी चालताना
एकटे एकटे असताना
एकटक कुठेतरी पाहताना
बघ माझी आठवण येते का.....

आरशात निरखून बघताना
आपलच सुंदर रूप पाहून लाजताना
लाजत लाजत हसताना
बघ माझी आठवण येते का.....

चांदराती फिरताना
अबोल संध्येशी बोलताना
तुटता तारा पाहताना
बघ माझी आठवण येते का.....

नको त्या कारणावरुण रुसताना
मुसू मुसू तू रडताना
डोळ्यातले अश्रु पुसताना
बघ माझी आठवण येते का.....

संकटाना सामोरी जाताना
यशाची शिखरे गाठताना
मोकळी वाट चालताना
बघ माझी आठवण येते का.....

मनाला मन जोडताना
क्षण क्षण जगताना
प्रत्येक श्वास घेताना
बघ माझी आठवण येते का.....
बघ माझी आठवण येते का.....

 
Design by Hanumant Nalwade | Bloggerized by Blogger|